मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची गच्छंती ?

71

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची लवकरच गच्छंती  होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबतची हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माजी मंत्री कृपाशंकर सिंह किंवा आमदार भाई जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात क्लिन चिट मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांचे पक्षात पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तर भारतीय समाजाला आकृष्ट करण्यासाठी सिंह यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी होऊ लागली आहे. तर मुंबईसाठी मराठी अध्यक्ष देण्यासाठी पक्षातील एक गट सक्रिय झाला आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांना हटवून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.