मुंबई काँग्रेसमधील ‘हा’ मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

102

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील राजीनामा दिला आहे.  कृपाशंकर सिंह बुधवारी (दि.११)  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  यामुळे काँग्रेसला  हा मोठा  धक्का  मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कृपाशंकर सिंह यांनी जवळीक वाढवली होती. त्यामुळे कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.  मुख्यमंत्री फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी कृपाशंकर सिंह यांच्या घरी गेले होते. त्यामुळे कृपाशंकर सिंह हे आता भाजपवासी होणार हे निश्चित मानले जात होते.

दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे  उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले  आहे. आता कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार  आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे.