मुंबई आणि गुजरातमधून आठ हजार किलो शार्क माशांचे कल्ले जप्त

455

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – भारतीय गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आणि गुजरातमधून तब्बल आठ हजार किलो शार्क माशांचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईने तस्करीची मोठी साखळी उध्वस्त केली असल्याचा दावा गुप्तवार्ता संचालनालयाने केला आहे.

याप्रकरणी मुंबई आणि गुजरात येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गुप्तवार्ता संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र व्यापार संचालनालयाने शार्क माशांच्या कल्ल्यांवर बंदी आणलेली आहे. मात्र मुंबई आणि गुजरात येथून मोठ्या प्रमाणात शार्क माशांचे कल्ले चीन आणि हाँगकाँगला निर्यात केले जाणार असल्याची माहिती गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती. यावर गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या शिवडीमधील गोदामातून तीन हजार किलो, तर गुजरातमधील वेरावलमधून पाच हजार किलो शार्क माशाचे कल्ले हस्तगत केले. कारवाईत एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, शार्क माशाच्या कल्ल्यांचे सुप तैयार करण्यात येते. चीन आणि व्हिएतनाममध्ये ‘शार्क फिन सूप’ला मोठी मागणी आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये मोठ मोठ्या कार्यक्रमांमधील जेवणामध्ये या सूपचा वापर होतो.