मुंबईहून पुण्याकडे येणारा द्रुतगती मार्ग आज २ तासांसाठी बंद  

146

पुणे, दि. ६ (पीसीबी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (गुरुवार) सूचना फलक लावण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणारा द्रुतगती मार्ग दुपारी १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. हा बंद फक्त आज २ तासासाठी राहील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. यामुळे द्रुतगतीवरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे.

तर गणेशोत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन सूचना फलक बसवले जाणार आहेत.खालापूर टोलनाक्यावरील महत्त्वाच्या दुरुस्तीकामांसाठी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा द्रुतगती मार्ग आज दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर सकाळी भीषण अपघात झाला. खोपोलीजवळ कंटेनरने ट्रकला धडक दिली. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. यानंतर आणखी एक अपघात झाला. या अपघातात चार वाहनांनी एकमेकांना धडक दिली.