मुंबईमध्ये रेल्वेरुळावर सापडले आईसह तिघांचे मृतदेह; एकजण गंभीररित्या जखमी

25

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : मुंबईतील नालासोपारा भागात आईसह दोन मुलांचे मृतदेह रेल्वेरूळावरून आढळून आले आहेत. नालासोपारा ते वसई रेल्वेस्थानकादरम्यान ही घटना घडली असून हि घटना अपघात असल्याचं दिसत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तर या तिघांनी आत्महत्या केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेने अखंड नालासोपारा हादरला आहे.

नालासोपारा-वसई रेल्वेस्थानका नजीक शनिवारी रेल्वे रुळावर एका महिलेसह दहा वर्षीय मुलगा आणि एका मुलीचा मृतदेह आढळून आला. तर जवळच एक जण जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेत आईसह मुलगा जागीच मरण पावले असून मुलगी गंभीररित्या जखमी झाली होती. रेल्वेखाली आल्याने आई व मुलाच्या मृतदेहाची अवस्था छिन्नविछिन्न झाली होती. हा घटना समोर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह आणि जखमीला ताबडतोप रुग्णालयात दाखल केले आहे. मृत व्यक्ती विरारमधील रहिवासी असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय वसई रेल्वे पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

WhatsAppShare