१५ ऑगस्टपूर्वी राज्यात ‘म्हाडा’च्या १४ हजार ६२१ घरांची लॉटरी

150

मुंबई, दि, ९ (पीसीबी) – मुंबईत हक्कांच्या घरासाठी लढा उभारणाऱ्या गिरणी कामगारांसाठी एक चांगली बातमी आहे. म्हाडाकडून मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी ५०९० घरांची लॉटरी काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यभरात १४,६२१ घरांसाठी १५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्याने जाहीरात देण्यात येणार आहे. मुंबईत यापूर्वी सुद्धा गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात आलेल्या घरांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात आले आहे.

म्हाडाकडून लवकरच नवीन पुनर्विकास धोरण जाहीर करण्यात येणार आहे. गिरणी कामागारांव्यतिरिक्त अन्य मुंबईकरांना खूष करणारी कोणतीही घोषणा म्हाडाकडून करण्यात आलेली नाही. मुंबईत ५०९० घरांसाठी जी लॉटरी निघणार आहे ती घरे फक्त गिरणी कामगारांसाठी आहेत.

औरंगाबादमध्ये १४२, नाशिकमध्ये ९२, कोकणात ५३००, नागपूरमध्ये ८९१, पुण्यात २००० आणि अमरावतीमध्ये १२०० घरे म्हाडाकडून बांधण्यात येणार आहेत.