मुंबईत मोदींच्या पोस्टरला युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी काळे फासले

500

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – इंधन दरवाढीविरोधाच्या निषेधार्थ महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला आज (गुरूवार) मुंबईतील आंदोलनादरम्यान काळे फासले.  

पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळत   आहे. गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात जाऊन पेट्रोल भरत आहे.