मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड 

200

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला   मनसेने पाठिंबा दिला आहे.  या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केल्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दिंडोशीत भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका, अशी सूचना केली असतानाही कार्यकर्ते रस्त्यावर हिंसा करताना दिसत आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देत आहेत. तर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

‘भारत बंद’ला रस्त्यावर उतरुन मनसे कार्यकर्ते पाठिंबा देतील, पण याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी, असे आवाहन राज ठाकरेंनी  करूनही कार्यकर्त्यांनी त्यांच्या सुचनांचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे.