मुंबईत मनसेकडून ९ रूपये स्वस्त दराने पेट्रोलचे वाटप

67

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांकडून आज (गुरुवार) भाखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर ९ रुपये स्वस्त दराने दुचाकीस्वारांना पेट्रोलचे वाटप करण्यात येणार आहे.

भायखळा विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. इंधन दरवाढीने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेने थोडासा दिलासा देण्याचा हा प्रयत्न केल्याचे मनसे विधानसभा अध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भायखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर केवळ दुचाकीस्वारांना पेट्रोलचा गुरुवारी दर असेल, त्याहून ९ रुपये स्वस्त दराने पेट्रोलवाटप केले जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.