मुंबईत कार अडवून अभिनेत्रीवर दोघांचा हल्ला

1205

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुंबईतील वर्सोवा परिसरात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीवर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यात ती जखमी झाली. पोलिसांनी तत्काळ दोघा हल्लेखारांना ताब्यात घेतले.

रुपाली गांगुली चार वर्षाच्या मुलाला शाळेत घेऊन जात होती. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवरून आले. त्यांनी रुपालीची कार थांबवली आणि तिच्याशी वाद घातला. दोघांनी कारची काच फोडून रुपालीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली.  या घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.