मुंबईत कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

112

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना आज (मंगळवार) सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. तुर्डे यांनी मारहाण केलेल्यांमध्ये महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याच्या समावेश आहे. सोमवारी (दि. १३) रात्री हा प्रकार घडला. 

कुर्ल्यामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाईमुळे तुर्डे यांनी सरकारी कार्मचाऱ्यांना मारहाण केली. कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ मधून निवडणून आलेले संजय तुर्डे हेच मनसेशी एकनिष्ठ राहिले आहेत.

दरम्यान, नगरसेवक पदाची निवडणूक जिंकल्यानंतरही विरोधक उमेदवाने तुर्डेंवर हल्ला केला होता. विजयानंतर तुर्डे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर घराबाहेर जल्लोष करत असताना त्यांच्यासहीत त्यांच्या कार्त्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हा हल्ला केल्याच्या आरोप  तुर्डे यांनी केला होता.