मुंबईतील १२ गिर्यारोहकांची हिमाचल प्रदेशातून सुटका

0
433

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबईहून हिमाचाल प्रदेशात अडकलेल्या १२ ट्रेकर्सची इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या पोलिसांनी सुटका केली आहे. १२ ट्रेकर्सचा एक ग्रुप गिर्यारोहण करताना  गेल्या दोन दिवसांपासून बारशू ला पास या ठिकाणाहून गायब झाला होता. त्यांची उत्तरकाशी आणि हिमाचल या ठिकाणी असलेल्या सीमा भागातून सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या संकारी भागात हा ग्रुप गेला होता. तिथून सांगला या हिमाचल प्रदेश येथील ठिकाणी जात असताना ते हर की दून या ठिकाणीही पोहचले. तिथून ते राणीकंदामार्गे चित्कुल या ठिकाणी जात होते आणि नेमके त्याचवेळी ते हरवले. दोन दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. मात्र इंडो-तिबेटियन ५० बटालियनच्या पोलिसांनी त्यांची सुटका केली.

त्यांच्या सुटकेसाठी बचाव मोहीमही सुरु केली होती. मात्र बर्फवृष्टी होत असल्याने या बचाव आणि शोध मोहिमेत अडथळे येत होते. अखेर त्यांची सुटका आता करण्यात आली आहे. हे सगळेजण मुंबईचे असून त्यांच्यामध्ये ८ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.