मुंबईतील शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला; २ ठार, २३ जण जखमी

42

मुंबई , दि. १४ (पीसीबी) –  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल आज (गुरूवार) कोसळला. ही घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. तर २३ जण जखमी झाले आहेत.  

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  पुलाचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे.तर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.