मुंबईतील शिवसेनेचे हाजी अराफत यांचा भाजपमध्ये प्रवेश

454

मुंबई, २ (पीसीबी) – शिवसेना वाहतूक संघटनेच्या हाजी अराफत यांना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हाजी अराफत यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचीही भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर केलेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

शुक्रवारी महामंडळ नियुक्त्या जाहीर कऱण्यात आल्या. यावेळी हाजी अराफत शेख यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी, तर नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.