मुंबईतील रूग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेचा डॅशबोर्ड तयार करा; देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

54

प्रतिनिधी, १८ मे (पीसीबी) : मुंबईतील कोणत्या रूग्णालयांत किती खाटा शिल्लक आहेत, याची माहिती नसल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होत असून, याची माहिती देणारा एक डॅशबोर्ड तयार करावा आणि तो जनतेसाठी पाहण्यासाठी खुला असावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेतले जात नाही आणि केवळ भटकावे लागते, अशा तक्रारी अनेक रूग्णांकडून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एक डॅशबोर्ड तयार करून याची माहिती ऑनलाईन प्रत्येकाला पाहण्यासाठी उपलब्ध असावी. असे झाल्यास कोणत्या रूग्णालयात जायचे, याची माहिती रूग्णाला आधीच कळेल आणि ते त्याच रूग्णालयात जाऊ शकतील. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही.

WhatsAppShare