मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार; अजित पवारांचे आदेश

50

मुंबई,दि.१४(पीसीबी) – उमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लवकरात लवकर हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले.

अजित पवार यांनी “डबेवाल्यांचं कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी” त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पवार यांनी सांगितलं.