मुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक

666

पुणे, दि. २१ (पीसीबी) – विरुध्द दिशेने येवून एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवार (दि.२०) सकाळी मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़ होता.

याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यानुसार रवी अशोक सरतापे (वय ३२, रा़ नताशा एन्क्लेव्ह, कोंढवा खुर्द) याला अटक करण्यात आली आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी फिर्यादी महिला वाहतूक पोलिस मुंढवा येथील महात्मा फुले चौकात वाहतूक नियमन करण्याचे काम करीत होत्या़. यावेळी आरोपी रवी सरतापे हा केशवनगरकडून राँग साईडने येऊन मुंढव्याकडे जाणाऱ्या सिग्नलला थांबला होता़. त्यावेळी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मुंढव्याकडून येणारा सिग्नल सुटणार आहे़. तुमच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तुमची गाडी सिग्नलला साईडला घ्या़. तेव्हा त्यांना तोएकेरी भाषेत तूच साईडला हो़, त्यावर त्यांनी तू मला अरे तुरे बोलू नकोस असे म्हणाल्या़. त्याने मी अधिकाऱ्याचा मुलगा आहे़, तू मला काही शिकवू नकोस़, तेव्हा त्यांनी गाडी साईडला घ्या व वडिलांना बोलवा असे सांगितले़. रवी सरतापे हा वाद घालत असल्याचे पाहून त्याच चौकात असलेले पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तेथे आले व त्यांनी पोलीस शिपाई आढाव यांना गाडीला जॅमर लाव़ त्यास त्याचे वडिलांना घेऊन येऊ दे, असे म्हणाले़. त्यावर रवीने मी सगळ्यांना बघून घेईऩ माझे कोणी काही वाकडे करु शकणार नाही़, अशी धमकी देऊन या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला़ व वडिलांना घेऊन येतो, असे म्हणतच तो मुंढव्याच्या दिशने गेला़.  हवालदार भोसले यांना भेटला़. त्याच्या पाठोपाठ या महिला कर्मचारी गेल्या व हवालदार भोसले यांना घडला प्रकार सांगत असताना त्याने या महिला कर्मचाऱ्यांचा हात धरण्याचा प्रयत्न केला़. त्यांनी हात झटकल्यावर त्याने अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केला. पोलिसांनी रवीला अटक केली आहे. मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.