“मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, तुम्ही जयंत पाटलांशी बोलून घ्या”

146

महाराष्ट्र, दि.१(पीसीबी) – मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, तुम्ही जयंत पाटलांशी बोलून घ्या, असं कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट अजित पवार यांना कॉल केला. शेतकऱ्याने अजित पवार यांच्याकडे ऊस जळून जात असल्याची व्यथा सांगत कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली. अजित पवार यांनी आपण कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नसल्याचं स्पष्ट करत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलायला सांगितलं आहे.

दरम्यान शेतकऱ्याचा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमधील शेतकऱ्याचं नाव मारुती भापकर असं आहे. मी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या गावातील रहिवासी आहे. राहुल जगताप यांच्या गावाशेजारीच माझं गाव आहे. कुकडीचं आवर्तन आणखी 15 दिवसांनी सोडणार म्हणत आहेत. मात्र ऊस आणि इतर बाकीची पिकं जळून चालली आहेत, असं मारुती भापकर अजित पवारांनी सांगितलं.

WhatsAppShare