मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो ,काँग्रेस नेते बरळले

102

भंडारा, दि. १७ (पीसीबी) : मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांचा तोल ढळला. भाषणाच्या आवेशात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. याच पार्श्वभूमीवर आता समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

 

मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, नाना पटोले यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
भंडारा जिल्ह्यात काल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. काल संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केलं. तसा व्हिडीओ भंडारा जिल्ह्यात वायरल होत असून मोदी समर्थकांमध्ये पटोले यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.