मी तंबाखूचा प्रचार करत नाही- अजय देवगण

91

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – अभिनेता अजय देवगणने त्याच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यातील एक जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीतून अजय तंबाखूचा प्रचार करत असल्याची टीका होत आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अजयने मौन सोडण्यासाठी ‘मी तंबाखूचा प्रचार करत नाही’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

अजय कर्करोगाने पिडित असलेल्या चाहत्याच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्याने केला आहे. तसेच त्याने या जाहिरातीच्या करारामध्ये तंबाखूचा प्रचार करणार नसल्याचे देखील म्हटले आहे. ‘मी माझ्या करारामध्ये नेहमी म्हटले आहे की मी तंबाखूचा प्रचार करणार नाही. मी प्रचार करतो ती वेलचीची. माझ्या करारात असे म्हटले गेले आहे की या पदार्थामध्ये तंबाखू नाही. जर हीच कंपनी दुसऱ्या पदार्थांची विक्री करत असले तर त्या बद्दल मला माहिती नाही’ असा खुलासा अजय देवगणने केला आहे.

दरम्यान मी चित्रपटात धूम्रपान करणे टाळणेल परंतु कधी गरज लागली तर कामाचा भाग म्हणून ते पार ही पाडेल असे तो पुढे म्हणाला. ‘माझा आगामी चित्रपट दे दे प्यार देमध्ये मी एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे जो धूम्रपान करत नाही. पण जर पुढे कधी “कंपनी”सारख्या चित्रपटात मला मलिक भाईची भूमिका साकारावी लागली तर धूम्रपानाशिवाय या भूमिकेला न्याय कसा मिळेल? कोणाचेही नाव न घेता एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्या व्यक्तिरेखेच्या सर्व गोष्टी साद्य कराव्या लागतात’ असे अजय पुढे म्हणाला.