‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी

340

जयपूर, दि. २(पीसीबी) – ‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी तशी इच्छा नाही,’ असे वक्तव्य भाजपा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केले आहे. मुख्यमंत्री बनल्यास माझ्यावर अनेक बंधने येतील, त्यामुळे आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असे हेमा मालिनींनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातील हेमा मालिनी या भाजप खासदार आहेत. ‘तुम्हाला संधी मिळाल्यास मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?’ असा प्रश्न त्यांना राजस्थानमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.

‘अभिनय क्षेत्रातील कामामुळेच मला आजही ओळखले जाते आणि मी खासदार म्हणून निवडून येण्यातही याच प्रसिद्धीचा मोठा वाटा आहे,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले.