‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी

68

जयपूर, दि. २७ (पीसीबी) – ‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी तशी इच्छा नाही,’ असे वक्तव्य भाजपा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केले आहे. मुख्यमंत्री बनल्यास माझ्यावर अनेक बंधने येतील, त्यामुळे आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असे हेमा मालिनींनी म्हटले आहे.