‘मी जातोय, मला संपर्क करू नका’ – खासदार उदयनराजे

385

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – ‘मी जातोय. मला संपर्क करू नका’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शनिवार ( दि.१४ ) नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे उदयनराजे यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.  यावर मुंडे यांनी उदयनराजे यांच्याशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  राजेंनी ‘मी जातोय. मला संपर्क करु नका’, असे सांगितल्याची  माहिती मुंडे यांनी दिली आहे.

मुंडे म्हणाले की, मी उदयनराजे यांना संपर्क करण्याचे खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे मेसेज पाठवला की, मला संपर्क करू नका, मी जातोय, असे मुंडे यांनी सांगितले.  उदयनराजे माझे कॉलेजमध्ये सिनियर होते, तेव्हापासून आमची मैत्री आहे.  पवार साहेबांना अशा काळात महाराज सोडून गेले, याचे वाईट वाटते, असे मुंडे यांनी म्हटले आहे.