मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता

239

बंगळुरू, दि. २७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकातील आमदाराने आपण केंद्रीय गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता, असे वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. बसनगौडा पाटील यतनाल असे या आमदाराचे नाव आहे. बसनगौडा पाटील हे विजयपुरा मतदारसंघातील आमदर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी बुद्धिजीवी आणि उदारमतवादी देशविरोधी असल्याचेही म्हटले आहे.

‘बुद्धिजीवी या देशात राहतात, आपण ज्यासाठी कर भरतो त्या सर्व सुविधांचा लाभ घेतात. यानंतर आपल्या लष्कराविरोधात घोषणा देतात. आपल्या देशाला यांच्यापासून सर्वात जास्त धोका आहे. जर मी केंद्रीय गृहमंत्री असतो तर यांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता’, असे बसनगौडा पाटील यतनाल बोलले आहेत.

बसनगौडा पाटील यतनाल याआधीही एकदा वादात अडकले होते जेव्हा त्यांनी स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांना मुस्लिमांना मदत न करण्यास सांगितले होते.