मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची आई नाही; सानिया मिर्झाचे वीणा मलिकला प्रत्युत्तर

184

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – ‘वीणा, मी आपल्या मुलाला घेऊन शीशा पॅलेसमध्ये गेली नव्हती. यासाठी ना तुला चिंता करण्याची गरज आहे, ना इतर जगाला. कारण मला वाटतं माझ्या मुलाची इतर कोणाला असेल त्यापेक्षा जास्त काळजी मला आहे. दुसरं म्हणजे मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची ना डायटिशन आहे ना त्यांची आई किंवा मुख्याध्यापिका किंवा शिक्षक’, असे ट्विट करून प्रसिध्द टेनिस पट्टू सानिया मिर्झाने अभिनेत्री वीणा मलिक हिला प्रत्युत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये  सानिया मिर्झा आपला पती शोएब आणि मुलासोबत एका जंक फूड रेस्टॉरंटमध्ये गेली होती. यावरुन टीका करताना वीणा मलिकने ट्विट केले होते. या ट्विटनंतर सानिया मिर्झा चांगलीच संतापली. तिने ट्विटरच्या माध्यमातून वीणा मलिकला उत्तर दिले आहे. ‘सानिया, तुझ्या मुलाची मला चिंता वाटते. तुम्ही त्याला शिशा पॅलेसमध्ये घेऊन गेलात. हे त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही का ? जिथपर्यंत मला माहिती आहे, आर्चीज फक्त जंक फूडसाठी ओळखले जाते आणि तिथे जाणे खेळाडूंसाठी चांगले नाही. हे तुला माहिती असायला हवं कारण तु एक आई आहेस आणि खेळाडूदेखील’.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये  भारतीय संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सात वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. मात्र, पराभवानंतर पाकिस्तान संघावर सतत टीका होत असून सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. यामध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झालाही ट्रोल व्हावे लागत आहे.