मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही – अर्जुन खोतकर

68

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये अखेर मनोमिलन करण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. खोतकर यांनी माघार घेतल्याने लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून  दानवे यांचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत जालना येथील तिढा सुटला आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मी कडवट शिवसैनिक आहे दगाफटका करणार नाही. उध्दव ठाकरेंचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल. जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडणार आहे.

औरंगाबादमध्ये आज (रविवार)  युतीचा संयुक्त मेळावा  झाला आहे. आजपासून युतीच्या कामाला लागणार आहे. रावसाहेब तुम्ही राज्यभर फिरा, मी आणि पंकजा मुंडे दोघे तुमच्यासाठी जालना मतदारसंघात प्रचार करून जालन्यात युतीचा भगवा फडकवू, असे  खोतकर  म्हणाले.