“मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल”

116

पुणे,दि.२७(पीसीबी) – पुण्यातील कोथरूडमध्ये तुळजाभवनी माता आणि राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर बोलत होते.

यावेळी, मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल. सध्या खरं बोललो की किती त्रास होतो ते आम्हाला माहित आहे, असं म्हणत महाराजांनी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे, असं देखील इंदोरीकर महाराज यावेळी म्हणाले आहेत.