मिरची पूड टाकून अंडाबुर्जीच्या गाडीवर काम करणा-यास लुटले

73

थेरगाव, दि. ८ (पीसीबी) – अंडा बुर्जीच्या गाडीवर काम करणा-या एकावर मिरची पूड टाकून मारहाण करत, चाकूने वार करून लुटले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 5) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडली.

नीलेश पोपट राजिवडे (वय 32, रा. दिवड राजेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय नारायण जाधव (वय 43, रा. वाल्हेकवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 7) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी जाधव हे काम करीत असलेल्या अंडाबुर्जीच्या गाडीवर येऊन आरोपी राजिवडे याने पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपी राजिवडे याने अंडाबुर्जीच्या गाडीवरील मिरचीपूड जाधव यांच्या तोंडावर टाकली. त्यानंतर गल्ल्यात हात घालून दिवसभर केलेल्या धंद्याचे दोन ते तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. जाधव यांनी त्याला विरोध केला असता आरोपी राजिवडे याने खिशातील चाकू बाहेर काढून जाधव यांच्या गळ्यावर, डाव्या तळहातावर, बरगडीवर चाकूने वार केले. तसेच सिमेंटचा गट्टू पायावर मारून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare