मित्रासमोर केला महिलेचा विनयभंग

94

पिंपळे गुरव, दि. २३ (पीसीबी) – मित्रासोबत गाडीत बसत असताना एकाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.

अक्षय संजय मुरकूटे (रा. औंध-बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने बुधवारी (दि. 22) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 ते 19 सप्टेंबर दरम्यान फोनवर आणि पिंपळे गुरव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय हा फिर्यादी तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करीत असे. पिडित तरुणी तिचा मित्र झणकर पवार यांच्या मोटारीत बसत असताना आरोपी अक्षयने तिचा हात आणि कपडे पकडून मित्रासमोरच मारहाण करीत तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक सोळंखी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

WhatsAppShare