मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरूणावर कोयत्याने वार करून खून

447

चिंचवड, दि.७ (पीसीबी) –  वाल्हेकरवाडी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमित सुभाष पोटे (वय २७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर आणि फिर्यादी यांच्यात जुने वाद होते. या कारणावरून शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडे कॉलनी वाल्हेकरवाडी येथे आरोपींनी आपसात संगनमत करून कोयते घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी आले. त्यावेळी तिथे असलेल्या फिर्यादी यांचा मित्र अमित पोटे हा फिर्यादी यांना वाचवण्यासाठी भांडणामध्ये पडला. यावेळी चिडलेल्या आरोपींनी पोटे यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोटे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान पोटे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मयूर लोखंडे, पंकज जगताप, किशोर इंगळे आणि जहीद मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare