मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर कोयत्याने वार

121

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री मोरया चौक व साई चौक आदर्शननगर, मोशी येथे घडली.

अनिकेत बाळू धनवडे (वय 20, रा. आदर्शनगर, मोशी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय, सागर, अभिषेक खवळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र अजय जाधव मोरया चौक, मोशी येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून तिन्ही आरोपी आले. त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोयते व अन्य शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगण्यास मनाई आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare