‘माहेरी जा’ तुला उद्याचा दिवस दिसणार नाहि’ अशी धमकी देत विवाहितेचा छळ

458

चिखली, दि.१७ (पीसीबी) – विवाहित महिलेला धमकी देत  मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरकडच्यांविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौशल सुभेदार जैसवाल (पती), विमला सुभेदार जैसवाल (सासू), सुभेदार महादेव जैसवाल (सासरे), राहुल सुभेदार जैसवाल (दिर), काजल सुभेदार जैसवाल (नणंद) सर्व राहणार जय मल्हार हौ.सोसायटी मोरेवस्ती, चिखली असे या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला घरातील कामे करत नसल्याच्या कारणावरून ‘ तु तुझ्या आई- वडिलांकडे निघून जा. जर गेली नाहीस तर तुला उद्याचा दिवस दिसणार नाहि’ अशी धमकी देत तसेच घर आणि बुलेट गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये आणण्याची मागणी करत तिची मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना १७ मे २०१९ ते ४ आक्टोबर २०१९ या कालावधीत घडली. पुढील तपास सा.पोलिस निरीक्षक म्हस्के करीत आहेत.

 

WhatsAppShare