माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच दोन मुली झाल्याने विवाहितेचा छळ..

94

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – विवाहितेने माहेरहून पैसे आणावेत तसेच विवाहितेला दोन्ही मुलीच झाल्या या कारणावरून पती, सासू आणि नणंदेने तिचा छळ केला. ही घटना 25 एप्रिल 2012 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये अजमेरा कॉलनी पिंपरी येथे घडली.पती अजय पुरुषोत्तम पिल्ले (वय 39) सासू (वय 65) आणि नणंद (वय 32 सर्व रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 30 वर्षीय महिलेने सोमवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपी पती, सासू आणि नणंद यांनी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी सांगितले. मात्र विवाहितेने पैसे आणले नाहीत. त्यामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी यांना दोन मुली झाल्याने खूपच छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस हवालदार सनदी तपास करीत आहेत.