माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

93

भोसरी, दि. २ (पीसीबी) – पतीसाठी सोन्याची चेन, कपडे आणि कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला.या याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, सासू, दीर आणि दोन नणंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार नोव्हेंबर 2020 ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कांची चाळ, दापोडी येथे घडला.

पती कुणाल बाळकृष्ण किर्तीकुडाव, सासू लीला बाळकृष्ण किर्तीकुडाव, दीर अमर बाळकृष्ण किर्तीकुडाव, नणंद मीनाक्षी शिवाजी माने, नणंद कार्तिकी शरद मगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला घरातील कामकाज करण्यावरून वेळोवेळी टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती कुणालसाठी नवीन सोन्याची चेन, कपड्यांची मागणी करून माहेरहून कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत