मासिक पाळी नाही हे सिद्ध करून दाखवायला विद्यार्थींनीची अशा पद्धतीने तपासणी करणे दुदैवी

107

मुंबई, दि.१५ (पीसीबी)) – मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ६८ महाविद्यालयीन मुलींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील भूजमध्ये हा प्रकार घडला असून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ” अतिशय धक्कादायक !! २१ व्या शतकात वाटचाल करत असतांना आजही मासिक पाळी नाही हे सिद्ध करून दाखवायला विद्यार्थींनीची अशा अपमानकारकरित्या तपासणी करणे दुदैवी, चुकीचे व संतापजनक असल्याच सानागत संबंधीत संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.