मावळ येथील कान्हे नायगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच तात्याबा ऊर्फ मारुती मनाजी सातकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

101

 

मावळ, दि.७ (पीसीबी) – कान्हे नायगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच तात्याबा ऊर्फ मारुती मनाजी सातकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवार (दि.६) रोजी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अकस्मात निधन झाले.

कान्हे गावचे ज्येष्ठ व्यक्तीमत्व असलेले मारुती सातकर यांनी सुमारे १५ वर्षे कान्हे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये निवडून दोन वेळा सदस्य तर एक वेळा सरपंचपद भूषविले आहे. तसेच ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानचे ते आद्य विश्वस्त होते. मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मा. उपाध्यक्ष किशोर अशोक सातकर यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. मारुती सातकर यांचा दशक्रिया विधी बुधवार (दि.१५) रोजी वैकुंठभूमी, खापरे ओढा कान्हे येथे होणार आहे.

WhatsAppShare