मावळात आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

143

वडगाव, दि. २५ (पीसीबी) – आग्या मोहोळाच्या माशांनी हल्ला करुन चावा घेतलेल्या एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील वडगाव जवळ असलेल्या कोंडिवडे गावात घडली.

ज्ञानोबा बारकू लागमण (वय ५०, रा. ता. मावळ, गाव. कोंडिवडे) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मयत ज्ञानोबा लागमण हे नेहमीप्रमाणे कोंडिवडे येथील त्यांच्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक आग्या मोहोळाच्या माशांनी त्यांच्यावर हल्ला चडवला. माशांनी त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर यासह शरिरावर ठिकठिकाणी चावा घेतला. यावेळी त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांनी आरडा ओरडा सुरु केला. यावर शेतात काम करणारे त्यांचे नातेवाई त्यांच्या जवळ पोहचले त्यांनी माशांना हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ माशांनी ज्ञानोबा यांना चावा घेतला. नातेवाईकांच्या प्रयत्नानंतर काही वेळाने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.