माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

220

पुणे, दि. २१ (पीसीबी) – माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली असून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून धुके आणि पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.

कल्याणअहमदनगर महामार्गावर जवळपास १० किलोमीटर अंतरात माळशेज घाट आहे. या घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पुर्णतः थांबवण्यात आली. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पाऊस आणि धुके यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.