माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

69

पुणे, दि. २१ (पीसीबी) – माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली असून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून धुके आणि पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.