माळशेज घाटातली वाहतूक अखेर चार दिवसांनंतर सुरु

152

कल्याण, दि. २५ (पीसीबी) – ठाणे-पुणे मार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक अखेर सुरु झाली आहे. दरड कोसळ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अखेर चार दिवसांनी दरड हटवण्याचे काम सुरु पूर्ण झाले आहे.

सोमवारी (दि. २०) माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीचच्या सुमारास दरड कोसळली होती. दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला. यामध्ये टेम्पोचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला. तर संपूर्ण रस्त्यावर दगड आणि माती पडली आहे.

पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे चार दिवस हे काम सुरु होते. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरु झाली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना माळशेज घाटात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाटातल्या सर्व धबधब्यांच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.