मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी आणि समीर यांचा मुक्ततेसाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टाने स्वीकारला

78

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी खटल्यातून मुक्ततेसाठी मुंबई हायकोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने स्विकारला आहे. या अर्जावर १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

२९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावात झालेल्या या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर प्रिटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या समीर कुलकर्णीला पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली होती.

दरम्यान, हायकोर्टाने समीर कुलकर्णीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचीही या प्रकरणातून जामीनावर मुक्तता झाली. मात्र आता साध्वी आणि समीर यांनी खटल्यातून मुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर कोर्ट काय निकाल देणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.