मार्क झुकरबर्गचे सुमारे ११५३ अब्ज रुपयांचे नुकसान!

167

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला बुधवारी जोरदार झटका बसला. अवघ्या दोन तासात त्याची संपत्ती १६.८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ११५३ अब्ज रुपयांनी कमी झाली. डेटा सुरक्षेबाबत या सोशल मीडिया कंपनीवर सातत्याने निशाण्यावर आहे. याचा परिणाम आता कंपनीचं उत्पन्न आणि मार्क झुकरबर्गच्या एकूण संपत्तीवरही दिसायला लागला आहे.

कंपनीने बुधवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा युझर बेस वाढत नसून त्यामध्ये फारच घसरण झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी डेव्हिड वेहनर यांनीही सांगितले की, आगामी दिवसातही यात वाढ दिसण्याची शक्यता कमी आहे.

फेसबुकने वॉल स्ट्रीटला याची माहिती देताच कंपनीचे शेअर जोरदार आपटले. कंपनीच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांनी कपात झाली आहे. यामुळे मार्क झुकरबर्गची संपत्ती ११५३ अब्ज रुपयांनी घटली आहे.