मारेकऱ्यांनी कलबुर्गी प्रमाणे लंकेश यांच्या डोक्यात गोळी झाडण्याचे दिले होते आदेश

122

बेंगळुरु, दि. २ (पीसीबी) –  ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. लंकेश यांची हत्या करणारा मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला हत्येचे प्रशिक्षण देण्यात आले होते. एम. एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने डोक्यात गोळी झालून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकारे लंकेश यांच्याही डोक्यात गोळी झाडण्याबाबत त्याला कट्टर हिंदुत्ववादी गटाकडून सांगण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या चौकशी दरम्यान समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी परशुराम वाघमारे (वय २६) याने स्वतः आपल्याला प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली आहे. त्याने विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) सांगितले की, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागीतील बेळगाव येथील जंगलात एका कट्टर हिंदुत्ववादी गटाकडून हे प्रशिक्षण देण्यात आले होते. दरम्यान, किमान एकतरी गोळी लंकेश यांच्या डोक्यात झाडायची असे आपल्याला सांगण्यात आले होते. या प्रशिक्षणावेळी कलबुर्गींच्या हत्येत सहभाग असलेला एक आरोपीही सहभागी होता. यावरुन परशुरामला ट्रेनिंग देणारेच थेट कलबुर्गींच्या हत्याप्रकरणात सहभागी होते असे एसआयटीने म्हटले आहे.