मारुजीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

112

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मारुंजी येथील कोलते पाटील गेट समोर घडली.

अजय विक्रम पाटील (वय २२, मुळ रा. सारोळा, पो. निमखेडी ता. मुक्ताईनगर, जळगाव) असे मृत दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल विक्रम रामसिंग पाटील यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवार (दि.११) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा १५ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरुन कोलते पाटील गेट समोरुन जात होता. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने अजय याला जोरदार धडक दिली. यामध्ये अजयचा मृत्यू झाला. तर वाहनचालक वाहनासह फरार झाला. हिंजवडी पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.