मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्‍हा

0
42

चर्‍होली, दि. 29 (पीसीबी) : काहीही कारण नसताना दोन जणांनी एका तरुणास मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास चर्‍होली येथे घडली.

आकाश बाळू काकडे (वय ३०, रा. पठारे कॉलनी ,मॅगझीन चौक, दिघी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍याने गुरुवारी (दि. २८) याबाबत दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. वसिम हुसेन शेख (रा. चार नंबर शाळेच्‍या मागे, आळंदी, ता. खेडे, जि.पुणे) आणि अजित कुलाल (रा. चर्‍होली, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी आकाश काकडे हे त्यांचे मित्र आरोपी वसिम आणि अजित यांच्‍यासह दारु पिण्‍यासाठी व जेवण करण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी आरोपींनी काही एक कारण नसताना फिर्यादी यांच्‍याशी भांडण करण्यास सुरवात केली. फिर्यादी आकाश यांना खुर्ची व काचेची बाटली डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी व त्‍यांच्‍या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.