मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निमंत्रण   

122

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा  मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह ३ हजार विविध क्षेत्रातील दिग्गजांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.  त्यामुळे मायावती आणि अखिलेश यादव संघाचे हे निमंत्रण स्वीकारतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीतील विज्ञान भवनात येत्या १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय शिबिर होणार आहे. या कार्यक्रमासाठी संघाने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील तीन हजार लोकांना  निमंत्रण दिले आहे.

जास्तीत जास्त लोकांना संघाची विचारधारा आणि कार्यप्रणाली माहीत व्हावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ज्या नामवंतांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची नावे आम्ही जाहीर करणार नाही. कोणताही वाद निर्माण होऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे, असे संघाच्या एका नेत्याने सांगितले.