‘मायग्रेन’ म्हणजे नक्की काय? मायग्रेन वरती ‘हे’ आहेत घरगुती उपचार

38

आजकालच्या जीवनात ताण-तणावापासून कोणीही दूर नाही. त्यामुळे लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या डोकं वर काढू पाहतेय. सततची डोकेदुखी हि अचानक मायग्रेनचं (migraine) रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक आरोग्य समस्या असून ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. त्यामुळे मायग्रेन कडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. यासाठी मायग्रेनची योग्य आणि खरी माहिती असं आवश्यक असते…

मायग्रेनचा म्हणजेच अर्धशिशीच त्रास बऱ्याच जाणं असतो. याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा ही डोकेदुखी प्रखर उजेड, एखादा उग्र वास, चिंता-काळजी अथवा कर्णकर्कश आवाज यामुळे सुरू होऊ शकते. मात्र या व्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं डोकं दुखू शकतं….

 • 1. अपूरी झोप
 • 2. ताण-तणाव
 • 3. उच्च रक्तदाब
 • 4. अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं
 • 5. वातावरणातील बदल
 • 6. हॉर्मोन्समधील बदल
 • 7. धूर
 • 8. मासे, शेंददाणे किंवा लोणचं खाण्यामुळे
 • 9. सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे

प्रत्येकाची शरीररचना एक सारखी नसते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनचे कारण वेगळे असू शकते. जर आपल्याला सतत पुढील त्रास होत असेल तर आपल्याला मायग्रेन असू शकतो.

मायग्रेनची लक्षणे

 • 1. मळमळ, उलटी
 • 2. घाम सुटणे कामात रस न वाटणे
 • 3. डोक्याचा अर्धा भाग दुखणे
 • 4. धुसर दिसू लागणे
 • 5. भूक कमी लागणे
 • 6. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे
 • 7. अशक्तपणा
 • 8. डोळे दुखणे
 • 9. प्रखर उजेड आणि तीव्र आवाज सहन न होणे

 

मायग्रेन वरील उपचार
मायग्रेन दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय सुद्धा करू शकतो. जर का आपलं अर्धे डोकं दुखत असेल तर कदाचित हा मायग्रेन असू शकतो पण तरी देखील आपण घरगुती उपचार सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं फार गरजेचं आहे.

1. साजूक तूप – मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.

2. लवंग पावडर – डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.

3. पालक आणि गाजराचा रस- मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.

4. काकडी – काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने तुमची डोकेदुखी कमी होईल

5. लिंबाची साले – लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट           कपाळावर लावा.

6. मसास – कोमट तेलाने तुमच्या डोक्याला मसाज करा. हळूवार केलेल्या या हेडमसाजमुळे तुम्हाला बरं वाटू         लागेल.

7. द्राक्षाचा रस – ताजी द्राक्ष मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. डोकं दुखत असल्यास दिवसभरात      दोन वेळा पाण्यासोबत हे सरबत प्या.

8. सफरचंद – मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा

9. दालचिनी – दालचिनी पावडर हा मसाल्याचा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचं जेवण तर स्वादिष्ट होतच        शिवाय तुम्हाला मायग्रेनपासूनदेखील सुटका मिळू शकते. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून तुमच्या      कपाळावर लावा. तुम्हाला निवांत वाटू लागेल.

10. एक चमचा आल्याच्या रसात थोडं मध मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि प्या. ज्यामुळे तुमची          डोकेदुखी कमी होईल. त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास अथवा आल्याचा एक तुकडा तोंडात                      ठेवल्यासदेखील तुम्हाला आराम मिळू शकेल. आल्याचा रस पोटात गेल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकेल.

WhatsAppShare