मामुर्डीत मित्राच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक; बलात्काराचा व्हिडीओ चित्रीकरन करुन करत होता ब्लॅकमेल

90

किवळे, दि. ११ (पीसीबी) – मामुर्डीत मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करुन घटनेचा व्हिडीओ चित्रीकरन करुन पिडीतेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
वैभव गुलाब नारनवरे (वय ३४, रा. तुकारामनगर, मामुर्डी, किवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव हा पिडीत महिलेच्या पतीचा मित्र आहे. यामुळे वैभवचे पिडीत महिलेच्या घरी नेहमी येणेजाणे असायचे. यादरम्यान एके दिवशी मित्र घरात नसतानाचा फायदा घेत आरोपी वैभव पिडीत महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला तसेच तीच्यावर बलात्कार केला. त्याने या घटनेचा व्हिडीओ केला आणि वारंवार पिडीतेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्यू केले. त्यावरुन आरोपी वैभव याला पोलिसांनी अटक केली आहे.