मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने वाकड पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरे

160

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने वाकड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांवरील होणारे अत्याचार थांबवून महिलांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संघटनेचे निरीक्षक रामराव नवघन, कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, सुभाष कोठारी, दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, विकास कांबळे, अविनाश रानवडे, ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, विजय मैड, सतिश नगरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोगम, पीएसआय बाबर, कापरे, पन्हाळे, साळुंके, शेळके, गायकवाड, बनसोडे, हांगे, त्याचप्रमाणे महिला शहराध्यक्षा नुरजहॉन शेख, प्रिया टिंगरे, निकिता नवघन, राणी सोनवणे, दिव्या टिळक, गौरी शेठ, पुनम कांबळे आदी उपस्थित होते.