मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा

87

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माच्या प्रसिद्धीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. चित्रपटांमधील भूमिकांसाठी अनुष्काला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. परंतु अनुष्काच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयात अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
यापूर्वी अभिनेत्री काजोलचा मेनाचा पुतळा उभारण्यात आलाये. परंतु अनुष्काचा हा पुतळा इतर पुतळ्यांपेक्षा खास असणार आहे. कारण, अनुष्काचा हा पुतळा तुमच्यासोबत बोलणार आहे. अशा प्रकारचा बोलका पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात असणारी अनुष्का ही भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
या संग्रहालयाची टीम अनुष्काचा पुतळा उभारण्यासाठी तिच्या संपर्कात असून पुतळा उभारणीसाठीचे मोजमाप अन् इतर प्रकिया सुरू आहेत. पुतळा उभारल्यानंतर अनुष्काच्या हातात एक फोन दिला जाणार आहे. तो फोन उचलल्यानंतर तिचा ऐकू येईल.
अनुष्काच्या या पुतळ्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फीचर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यापूर्वी फुटबॉलपटू रोनाल्डो, ओपरा विन्फ्रे आणि लुईस हॅमिल्टन यांच्या जगप्रसिद्ध व्यक्तींचा असा पुतळा उभारण्यात आला आहे.